


दान पारमिता फाऊंडेशन तर्फे कार्यशाळेचे आयोजन
प्रतिनिधी – खोडद
सुलेमान व तुळजा बुद्ध लेणी येथे दान पारमिता फाउंडेशनच्या वतीने शिल्पकला व धम्मलिपि प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आले,
या कार्यशाळेमध्ये अमरावती, जालना, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर, मुंबई , नाशिकसह इतर ठिकाणाहून धम्मलिपीचे अभ्यासक उपस्थित झाले होते,
लेणीवर जाण्यासाठी रस्ता नसल्याने संस्थेच्या पदाधिकारी ह्यांनी गवत काढून रस्ता तयार केला व मोठया दोरखंडाच्या साहाय्याने सर्व लेणी अभ्यासकाना लेणीवर जाण्यासाठी अभ्यासकानी मदत केली,
लेणी मधील चैत्यगृहाची साफसफाई मिलिंद तेलुरे सरांनी केली , त्यानंतर दहा मिनिटे आनापान घेण्यात आले, त्यानंतर त्रिसरण पंचशील ग्रहण करून कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली,
यावेळी थेरवाद पंथाच्या प्रतिकांची माहिती व स्तुपाचे प्रकार संस्थेचे अध्यक्ष सुनील खरे ह्यांनी समजावून सांगितले,
संतोष आंभोरे ह्यांनी लेणींचा इतिहास सांगितला व भारतरत्न पुरस्कार ज्या पिंपळ पानावर दिला जातो ते शिल्प असलेली एकमेव लेणी म्हणजे सुलेमान लेणी असून ते शिल्प सर्वाना दाखवण्यात आले,
1 ते 3 डिसेंबर च्या दरम्यान बुद्धगया येथे गेलेल्या संस्थेच्या पदाधिकारी ह्यांनी संस्थेचे अध्यक्ष सुनील खरे ह्यांना भेट देण्यासाठी महाबोधी महाविहाराची प्रतिकृती तेथून आणली व भेट दिली,
त्यानंतर धम्म लिपी शिकलेल्या भावना पगारे, सुनील इंगळे, निवेदिता सावंत , पूजा गडगे ह्या विद्यार्थ्यांना धम्म लिपीचे सर्टिफिकेट संस्थेच्या माध्यमातून वितरित करण्यात आले ,
यावेळी दान पारमिता फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष सुनील खरे, सचिव संतोष आंभोरे, अशोक स्क्रिप्ट इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा रुपाली गायकवाड , विजया उमाळे, आकाश हजारे, किरण सोंडे, ज्ञानेश्वर सोनवणे, राजू पगारे, , रुपाली पगारे, शांता मुलगे, अर्चना वाघमारे, आशा यशवंते, वंदना नाईक, विकास रोडे, चंद्रकांत निकम, दिलीप वासनिक, मिलिंद तेलुरे, युवराज वाघ, भावना पगारे, शीतल बल्लाळ, स्वाती खोपे, साधना जाधव, राहुल बागले, ऍड विशाल जनबंधु विजय गायकवाड, व इतर अभ्यासक मोठ्या संख्येने अभ्यासक उपस्थित होते.
Discover more from Learn Pali ! Learn Buddha
Subscribe to get the latest posts sent to your email.
